News Flash

World Cup 2019 : धोनी तू कसोटी क्रिकेटच खेळ ! संथ खेळीनंतर नेटकरी धोनीवर संतापले

५२ चेंडूत धोनीच्या केवळ २८ धावा

विश्वचषक स्पर्धेत धावांचा रतिब घालणाऱ्या भारतीय संघाची अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात चांगलीच पंचाईत झाली. अफगाणि फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकलेला भारतीय संघ २२४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. मोहम्मद नाबी, राशिद खान, मुजीब उर रेहमान या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. विराट कोहली आणि केदार जाधवचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरुन मोठी खेळी करु शकला नाही. या सामन्यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी धोनीला चांगलच ट्रोल केलं आहे.

धोनीने ५२ चेंडू खर्ची घालत केवळ २८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत केवळ ३ चौकारांचा समावेश होता. ज्यावेळी भारताला धावसंख्या वाढवण्याची गरज होती, त्यादरम्यान धोनी आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी धोनीला चांगलेच उपरोधिक सल्ले दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 7:12 pm

Web Title: cricket world cup 2019 indian fans criticize ms dhoni after his slow inning vs afghanistan psd 91
टॅग : Ind Vs AFG,Ms Dhoni
Next Stories
1 Video : चोरटी धाव घेताना धोनी-केदार जाधवमध्ये सावळा गोंधळ
2 Video : पहा रहमत शाहने टिपलेला कोहलीचा सुपर-कॅच
3 World Cup 2019 : विराट कोहलीचं अर्धशतक, मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी
Just Now!
X