भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे बऱ्याच तासांचा खेळ वाया गेला. रात्री उशीरा पावसाने उसंत घेतल्यामुळे भारतीय संघासमोर डकवर्थ लुईस नियमांनुसार किती धावसंख्येचं लक्ष्य दिलं जाईल याची चर्चा सुरु झाली आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, ४६.१ षटकांच्या खेळात न्यूझीलंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर मैदानात पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ थांबवण्यात आला.

त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला पावसामुळे फलंदाजीची संधी न मिळाल्यास भारतीय संघासमोरचं लक्ष्य बदलेलं असेल. पंच आणि सामनाधिकारी खेळपट्टीची पाहणी करून याबद्दल योग्य तो निर्णय घेतील.

दरम्यान पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलचं अडकवून ठेवलं. कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतक झळकावलं.