दीपक जोशी

कारकीर्दीतील शेवटचा विश्वचषकखेळणाऱ्या श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाला शुक्रवारी एक विक्रम साद घालतो आहे. मलिंगाने विश्वचषकात ५१ बळी मिळवले आहेत. शुक्रवारी त्याने पाच बळी मिळवल्यास विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी झेप घेईल. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (७१), मुथय्या मुरलीधरन (६८) आणि पाकिस्तानचा वसीम अक्रम (५५) हे तूर्तास अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. त्याशिवाय आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने (६१ बळी) श्रीलंकेविरुद्ध दोन बळी मिळवल्यास आफ्रिकेतर्फे श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या मखाया एन्टिनीला (६२ बळी) तो मागे टाकेल.