21 September 2020

News Flash

World Cup 2019 : तुमचा कायम ऋणी राहीन, मोहम्मद शमीने मानले भारतीय चाहत्यांचे आभार

शमीचा विश्वचषक स्पर्धेत भेदक मारा

विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाकडून गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीने आपली कामगिरी चोख बजावत, साखळी फेरीत भारताला अव्वल स्थानी ठेवण्यात महत्वाचा वाटा उचलला.

उपांत्य सामन्यात मोहम्मद शमीला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर बरीच टीकाही झाली. मात्र शमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, सर्व भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहेत.

शमीने अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात हॅटट्रीकची नोंद केली होती. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा शमी दुसरा भारतीय गोलंदाज ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 10:15 am

Web Title: cricket world cup 2019 mohammad shami thanks indian fans for support psd 91
टॅग Mohammad Shami
Next Stories
1 World Cup 2019 : उपांत्य सामन्यात वादग्रस्त निर्णय देणाऱ्या पंचांना अंतिम सामन्यात संधी
2 World Cup 2019 : टीम इंडियामध्ये गटबाजी? निर्णय प्रक्रियेवरुन विराट-रोहितमध्ये मतभेद
3 सेलिब्रिटी कट्टा : न्यूझीलंडला कमी लेखू नका..
Just Now!
X