News Flash

Video : धोनीचे चाहते आहात? मग हा झेल एकदा पाहाच….

बुमराहच्या गोलंदाजीवर ब्रेथवेटचा घेतला झेल

महेंद्रसिंह धोनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेमध्ये आहे. फलंदाजीमध्ये धोनीने केलेल्या संथ खेळामुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यानंतर विंडीजविरुद्ध सामन्यातही धोनीला फारशी चमक दाखवता आली नाही. अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत धोनीने अर्धशतक साजरं केलं खरं, मात्र त्याआधीच्या षटकांमध्ये धोनीचा संथ खेळ पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरेत आला.

अवश्य वाचा – World Cup 2019 : मला संधी द्या, हार्दिकला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनवतो !

मात्र यष्टीरक्षणात धोनी अजुनही आपला फॉर्म कायम राखून आहे. २६९ धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं. २७ व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टींमागे कार्लोस ब्रेथवेटचा झेल टिपला. आपल्या उजव्या बाजूला उडी मारत केवळ एका हाताने टिपलेला धोनीचा झेल सर्वांची वाहवा मिळवून गेला.

दरम्यान २६९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ १४३ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 2:26 pm

Web Title: cricket world cup 2019 ms dhnoi take one handed catch against wi watch video here psd 91
टॅग : Ind Vs WI,Ms Dhoni
Next Stories
1 World Cup 2019 : मला संधी द्या, हार्दिकला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनवतो !
2 दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या संघाचे आव्हान संपुष्टात
3 World Cup 2019: ‘धोनी एक महान खेळाडू’, टीकाकारांना विराट कोहलीचं उत्तर
Just Now!
X