26 September 2020

News Flash

World Cup 2019 : ऋषभ पंत टीम इंडियाच्या सरावसत्रात, धोनीने दिल्या टिप्स

रविवारी भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे सध्या संघाच्या बाहेर आहे. धवनच्या अनुपस्थितीमध्ये लोकेश राहुल सलामीला येणार आहे. मात्र धवनची दुखापत बरी झाली नाही तर पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंत सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाने मँचेस्टरमध्ये कसून सराव केला. या सरावसत्रातही पंतने सहभाग घेतला.

अवश्य वाचा – World Cup 2019 : Ind vs Pak टीम इंडियाचा कसून सराव, पाहा हे खास फोटो

यावेळी भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने सरावादरम्यान पंतला खास टिप्सही दिल्या

दरम्यान, शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामीला येईल. चौथ्या क्रमांकाची जागा ही विजय शंकला मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गोलंदाजीचा सामना करण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : आमचा विजय निश्चीत, विराट कोहलीने व्यक्त केला आत्मविश्वास

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 7:26 pm

Web Title: cricket world cup 2019 ms dhoni seen giving wicket keeping tips to rishabh pant in manchester watch video psd 91
Next Stories
1 World Cup 2019 Aus vs SL : कांगारुंची लंकेवर मात, कर्णधार करुणरत्नेची झुंज अपयशी
2 India vs pakistan: हा सामना म्हणजे फायनल आधीची ‘फायनल’ – इंझमाम उल हक
3 Ind vs Pak : आमचा विजय निश्चित, विराट कोहलीने व्यक्त केला आत्मविश्वास
Just Now!
X