28 September 2020

News Flash

World Cup 2019 : मुजीब उर रेहमानचा पराक्रम, दिग्गज गोलंदाजांना न जमलेली केली कामगिरी

रोहित शर्माचा उडवला त्रिफळा

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात, नवोदीत मुजीब उर रेहमानने अनोखी कामगिरी आपल्या नावावर जमा केली आहे. सलामीवीर रोहित शर्माला मुजीबने पाचव्या षटकामध्ये त्रिफळाचीत केलं. २०१९ विश्वचषकात भारतीय फलंदाजाला बाद करणारा मुजीब पहिला फिरकीपटू ठरला आहे. याआधी एकाही फिरकीपटूला ही कामगिरी जमली नाहीये.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा डोंगर उभा करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मुजीबने रोहितचा त्रिफळा उडवत भारताला धक्का दिला. यानंतर लोकेश राहुलही मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 4:21 pm

Web Title: cricket world cup 2019 mujib ur rehman becomes first spinner to dismiss indian batsman psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : संधी हुकल्यानंतर मी अधिक सकारात्मक झालो – ऋषभ पंत
2 World Cup 2019 IND vs AFG : खूब लढा अफगाणिस्तान… पण अखेर भारताचा विजय
3 BLOG : विश्वचषक स्पर्धेला अशा रंगतदार सामन्यांची गरज
Just Now!
X