ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने विश्वचषक स्पर्धेत आपल्याच देशाच्या माजी गोलंदाजाचा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात मिचेल स्टार्क, एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोचा बळी घेत स्टार्कने २०१९ विश्वचषक स्पर्धेत आपल्या नावावर २७ व्या बळीची नोंद केली. त्याने माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा २६ बळींचा विक्रम मोडला.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २२३ धावांपर्यंतच मजल मारु शकला. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.