News Flash

World Cup 2019 : हिटमॅनची विकेट ढापली? नेटीझन्स पंचांवर भडकले

तिसऱ्या पंचांचा वादग्रस्त निर्णय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात रोहित शर्माला तिसऱ्या पंचांनी बाद ठरवल्याच्या निर्णयावर सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. रोहित शर्माने २३ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने आश्वासक सुरुवात केली होती. केमार रोचच्या गोलंदाजीवर खेळत असताना चेंडू रोहितची बॅट आणि पॅड यांच्यामधून यष्टीरक्षकाकडे गेला.

विंडीजच्या खेळाडूंनी रोहित बाद असल्याचं अपील केलं, मात्र पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ते फेटाळून लावलं. तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही Ultra age प्रणालीवर चेंडू स्पष्टपणे बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचं सिद्ध होतं नव्हतं. मात्र तिसरे मंच मायकल गॉग यांनी रोहित बाद असल्याचा निर्णय दिला. या प्रकारानंतर भारतीय चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर पंचांना आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं आहे.

दरम्यान रोहित शर्मा माघारी गेल्यानंतर भारताच्या डावाला गळती लागली. लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव हे फलंदाज झटपट माघारी परतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 5:35 pm

Web Title: cricket world cup 2019 rohit sharma victim of poor umpiring fans slam decision of 3rd umpire psd 91
टॅग : Ind Vs WI,Rohit Sharma
Next Stories
1 World Cup 2019 : विराटची रनमशीन सुस्साट ! सचिन-ब्रायन लारा-पाँटींगला टाकलं मागे
2 Video : फिल्डिंगमधलं भन्नाट ‘फुटवर्क’! कर्णधार होल्डरने ‘असा’ अडवला चौकार
3 World Cup 2019 IND vs WI : भारत अजिंक्यच! कॅरेबियन वादळ मात्र शमलं…
Just Now!
X