३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. ५ जून रोजी भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असा आत्मविश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंनी एअरपोर्टवर वेळ घालवला.

इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी, संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी रवी शास्त्री यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. रवी शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधरही हजर होते. यावेळी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी तिघांनीही साईबाबांकडे प्रार्थना केली.

अवश्य वाचा – विश्वचषकाला रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक रवी शास्त्री साईबाबांच्या चरणी

दरम्यान, World Cup २०१९ हा सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक विश्वचषक असेल. कारण हा एकदिवसीय विश्वचषक आहे. आतापर्यंत मी जे एकदिवसीय विश्वचषक खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे, असे वक्तव्य टीम इंडियाचा कर्णधार विराट याने केले. यंदाचा विश्वचषक हा इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी प्रयाण करण्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. या वेळी प्रशिक्षक रवी शास्त्री हेदेखील उपस्थित होते.