29 September 2020

News Flash

World Cup 2019 : Ind vs Pak टीम इंडियाचा कसून सराव, पाहा हे खास फोटो

ऋषभ पंतही इंग्लंडमध्ये दाखल

२०१९ विश्वचषक स्पर्धेत रविवारी दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मँचेस्टरच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरीही टीम इंडियाने या सामन्यासाठी कसून सराव केला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या सरावसत्राचे फोटो शेअर केले आहेत.

शिखर धवनला झालेल्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे पर्यायी खेळाडू ऋषभ पंतही इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. त्यानेही आज टीम इंडियासोबत सरावसत्रात सहभाग घेतला.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामीला येईल. चौथ्या क्रमांकाची जागा ही विजय शंकला मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गोलंदाजीचा सामना करण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 5:17 pm

Web Title: cricket world cup 2019 team india practice hard for important match against pakistan psd 91
टॅग Ind Vs Pak
Next Stories
1 भारत-पाक सामन्याचं ब्लॅकमध्ये मिळू शकतं खोटं तिकीट, स्कॉटलंड यार्डचा इशारा
2 विश्वचषकात पावसाचा खेळखंडोबा, प्रसारण करणाऱ्या कंपनीला आतापर्यंत १०० कोटींचा फटका
3 पाकिस्तानी क्रिकेटर म्हणतोय, विराटला पाहून फलंदाजी शिकतोय
Just Now!
X