12 August 2020

News Flash

WC Final : ‘माफ करा, आम्हाला जिंकता आलं नाही’; ट्रेंट बोल्टला भावना अनावर

न्यूझीलंडच्या चाहत्यांची मागितली माफी

विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला घरचा रस्ता दाखवणारा न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडकडून पराभूत झाला. न्यूझीलंडने २४१ धावा करून इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री (चौकार-षटकार) मारण्याच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आला. याबाबत सुपर ओव्हर टाकणारा ट्रेंट बोल्ट याने भावना व्यक्त केला आहे.

“आम्हाला इंग्लंडहून न्यूझीलंडला येण्यासाठी खूप वेळ लागला. विमान प्रवास खूप मोठा होता, पण तरीदेखील अंतिम सामन्यातील पराभव विसरणे शक्य झालेले नाही. मला अपेक्षा होती की मी त्यातून बाहेर येईन, पण तसं अजून तरी झालेलं नाहीये. काही गोष्टी या कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी दीर्घ काळ लक्षात राहतात”, असे बोल्ट म्हणाला.

मूळ सामन्यात शेवटच्या षटकात जयंत ओव्हर थ्रो च्या धावा गेल्या. त्याबाबतही बोल्टने उत्तर दिले. तो म्हणाला की सामन्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींचा खूप फरक पडतो. तो ओव्हरथ्रो चा चौकार गेला नसता तर निकाल वेगळा लागू शकला असता. ते शेवटचे षटक अजूनही माझ्यात डोक्यात आहे. मला हवेतून नव्हे, तर जमनींवरुन षटकार मारण्यात आला जे या आधी कधीच घडले नव्हते याचा विचार मी सर्वात जास्त करत आहे. त्याहूनही पुढची गोष्ट म्हणजे दोनही संघांची धावसंख्या समान होती. तरीदेखील आम्ही सामना पराभूत झालो ही गोष्ट पचनी पडणे कठीण जात आहे.

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सलामीवीर हेन्री निकोल्स (५५) आणि टॉम लॅथम (४७) यांच्याव्यतिरिक्त कोणीही जबाबदारीने खेळ केला नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडला विजयासमीप नेले.स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 9:43 am

Web Title: cricket world cup 2019 trent boult emotional message sorry new zealand fans vjb 91
Next Stories
1 स्टोक्सने पंचांना ‘ओव्हर-थ्रो’च्या धावा न देण्याचे सुचवले होते!
2 Viral Video : आजीबाई जोरात… इंग्लंडच्या विजयानंतर केलं धमाकेदार सेलिब्रेशन!
3 कमनशिबी फॅन! ५० तासांच्या प्रवासानंतरही ‘सुपर-ओव्हर’ला मुकला…
Just Now!
X