News Flash

World Cup 2019 : धोनीचा ‘तो’ रनआऊट दुर्दैवी, पंचांकडून न्यूझीलंडच्या चुकीकडे डोळेझाक?

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. २४० धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताचे सर्व दिग्गज फलंदाज आज न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ढेपाळले. अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता सर्वांनी निराशा केली.

जाडेजा आणि धोनी यांनी शतकी भागीदारी रचत भारतीय संघासाठी विजयाच्या आशा जागवल्या. मात्र दोन्ही फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने सामना भारताच्या हातातून निसटला. या सामन्यात धोनीची रनआऊट विकेट ही दुर्दैवी मानली जात आहे. मार्टीन गप्टीलने चेंडू थेट फेकत धोनीला माघारी धाडलं. मात्र याआधी मैदानावरील पंचांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या एका चुकीकडे डोळेझाक केल्याची चर्चा सुरु आहे.

फर्ग्युसन टाकत असलेलं षटकं हे पॉवरप्लेचं षटकं होतं. आयसीसीच्या नियमांनुसार पॉवरप्लेमध्ये पाचपेक्षा जास्त क्षेत्ररक्षक हे मर्यादीत सर्कलच्या बाहेर उभे राहू शकत नाही. असं झाल्यास तो चेंडू नो-बॉल ठरवण्यात येतो. मात्र धोनी फलंदाजी करत असताना फर्ग्यसुनच्या गोलंजादीवर न्यूझीलंडचे सहा क्षेत्ररक्षक मर्यादीत सर्कलच्या बाहेर असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओवरुन भारतीय चाहत्यांमध्ये अनेक मतमतांतर आहेत. काहींच्या मते पंचांनी हा चेंडू नो-बॉल दिला असता तरीही, धोनीला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं असतं. तर काही चाहत्यांच्या मते पंचांना ही बाब चेंडू टाकायच्या आधीच लक्षात आली असती, तर त्यांनी न्यूझीलंडच्या कर्णधाराला याबद्दल सूचना दिली असती आणि क्षेत्ररक्षण बदलून निकाल कदाचीत वेगळा लागू शकला असता. दरम्यान आयसीसीकडून या प्रकाराबद्दल कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 10:38 pm

Web Title: cricket world cup 2019 umpires fail to notice huge error by nz players in fielding ms dhoni video goes viral psd 91
टॅग : Icc,Ind Vs Nz,Ms Dhoni
Next Stories
1 World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर विराट कोहली म्हणतो….
2 World Cup 2019 : ती ४५ मिनीटं आम्हाला महाग पडली, विराटने स्विकारला भारताचा पराभव
3 World Cup 2019 : क्षेत्ररक्षण-गोलंदाजी-फलंदाजी, उपांत्य सामन्यात सबकुछ रविंद्र जाडेजा !
Just Now!
X