विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर राखीव दिवसाच्या खेळात भारताने न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखलं. २४० धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताचे पहिले ४ फलंदाज झटपट माघारी परतले. भारताचे आघाडीचे ३ फलंदाज अवघी एक धाव काढून माघारी परतले.

विराट कोहलीने या सामन्यातही नकोशी परंपरा कायम राखली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहली चांगला खेळ करत नाही हा इतिहास आहे. गेल्या ३ विश्वचषक स्पर्धांची आकडेवारी याचीच साक्ष देते.

पहिले ४ फलंदाज माघारी परतल्यानंतर ऋषभ पंतने फटकेबाजी करत संघाला काही दिलासा दिला. सध्याच्या घडीला ऋषभ पंतच्या नावावर उपांत्य फेरीच्या सामन्यात विराटपेक्षा जास्त धावा जमा आहेत.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी मँचेस्टरच्या मैदानावर ढगाळ वातावरणाचा फायदा घेत भारताची आघाडीची फळी कापून काढली.