News Flash

Cricket World Cup 2019 : विराटचा अर्धशतकी खेळीचा चौकार, विंडीजविरुद्ध एकाकी झुंज

सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज ढेपाळले

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात कडवी झुंज मिळाली आहे. विंडीजविरुद्ध सामन्यात भारतीय फलंदाजी आज पुन्हा एकदा कोलमडली. लोकेश राहुल आणि विराट कोहलीचा अपवाद वगळता सर्व फलंदाज झटपट माघारी परतले. केमार रोच आणि जेसन होल्डरने भारतीय डावाला खिंडार पाडलं. एकीकडे सर्व फलंदाज माघारी परतत असताना विराटने खेळपट्टीवर तग धरत अर्धशतकी खेळीची नोंद केली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : विराटची रनमशीन सुस्साट ! सचिन-ब्रायन लारा-पाँटींगला टाकलं मागे

विराटने दुसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलसोबत भागीदारी करत संघाचा डाव सावरला. विराटने ८२ चेंडूत ८ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. या स्पर्धेतलं विराटचं हे चौथं अर्धशतक ठरलं. विश्वचषक स्पर्धेत सलग सामन्यांत अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने स्थान मिळवलं आहे.

विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीचा सामना वगळता विराटने सर्व सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावलं आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : हिटमॅनची विकेट ढापली? नेटीझन्स पंचांवर भडकले 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 6:36 pm

Web Title: cricket world cup 2019 virat enters prestigious list of most consecutive fifty plus scores by a captain in the world cup psd 91
टॅग : Ind Vs WI,Virat Kohli
Next Stories
1 World Cup 2019 : हिटमॅनची विकेट ढापली? नेटीझन्स पंचांवर भडकले
2 World Cup 2019 : विराटची रनमशीन सुस्साट ! सचिन-ब्रायन लारा-पाँटींगला टाकलं मागे
3 Video : फिल्डिंगमधलं भन्नाट ‘फुटवर्क’! कर्णधार होल्डरने ‘असा’ अडवला चौकार
Just Now!
X