भारताचा पुढील सामना शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. शुक्रवारी भारतीय संघाने साऊदम्पटनमध्ये लहान मुलांसोबत खेळण्याचा सराव केला. लहान मुलांसोबत ‘बल्ले बल्ले’ करणाऱ्या विराट कोहलीचा हा फोटो सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ‘शनिवारीही लिंबूटिंबू अफगाणिस्तानच्या लहान मुलांविरुद्ध भारतीय संघ विजयी बल्ले बल्ले करणार’, ‘किंग कोहलीचा इंग्लंडमध्ये भांगरा’, ‘दुखापती टाळण्यासाठी लहान मुलांसोबत सराव’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया या फोटोवर उमटत आहेत.