२०१९ विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी मात करत पाचव्या विजयाची नोंद केली. या स्पर्धेत भारतीय संघाचा हा पाचवा विजय ठरवला. ७२ धावांची अर्धशतकी खेळी करत विराटने भारतीय संघाला २६८ धावसंख्येपर्यंत पोहचवण्यास मदत केली. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ १४३ धावांवर माघारी परतला. या विजयासह कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

मायदेशाबाहेर आणि आशिया खंडाबाहेर सलग १० वन-डे सामने जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

विंडीजविरुद्ध सामन्यात विराटने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले. फलंदाजीदरम्यान विराटने सर्वात जलद २० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. यावेळी विराटने सचिन-लारा-पाँटींग या महान त्रिकुटाचा विक्रम मोडला. तर विश्वचषक स्पर्धेत सलग चौथ्या अर्धशतकाची नोंद करत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा विक्रमही आपल्या नावे जमा केला.