02 December 2020

News Flash

Video : भारत-पाक सामन्याचं तिकीट मिळेलं? विराट म्हणतो, घरी बसा आणि टिव्हीवर सामना पाहा…

भारत-पाक सामन्याची संपूर्ण तिकीट संपली

स्पर्धा कोणतीही असो, भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अशात जर विश्वचषकात, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असेल तर सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या पडतात. इतर सामन्यांच्या तुलनेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचे दर देखील चढ्या भावाने विकली जातात. अशावेळी प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपल्या ओळखीमधून भारत विरुद्ध पाक सामन्याचं तिकीट मिळतंय का हे पाहत असतो.

अवश्य वाचा – Ind vs Pak : आमचा विजय निश्चित, विराट कोहलीने व्यक्त केला आत्मविश्वास

या सर्व गोष्टीमधून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील सुटलेला नाहीये. भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी मँचेस्टरच्या मैदानावर समोरासमोर येतील. त्याआधी विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराट कोहलीला सामन्याच्या तिकीटांबद्दल प्रश्न विचारला, यावेळी विराट कोहलीनेही तितकच मजेशीर उत्तर दिलं.

दरम्यान मँचेस्टरच्या मैदानावर रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमधला सामना कसा रंगतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : Ind vs Pak टीम इंडियाचा कसून सराव, पाहा हे खास फोटो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 8:56 pm

Web Title: cricket world cup 2019 virat kohli hilarious response to those seeking a ticket for the ind vs pak match psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : ऋषभ पंत टीम इंडियाच्या सरावसत्रात, धोनीने दिल्या टिप्स
2 World Cup 2019 Aus vs SL : कांगारुंची लंकेवर मात, कर्णधार करुणरत्नेची झुंज अपयशी
3 India vs pakistan: हा सामना म्हणजे फायनल आधीची ‘फायनल’ – इंझमाम उल हक
Just Now!
X