06 July 2020

News Flash

जाधव साहेबांमुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात ! विराटने शेअर केला केदारसोबतचा फोटो

विंडीजविरुद्ध सामन्यासाठी टीम इंडिया मँचेस्टरला रवाना

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पावसामुळे रद्द झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्याचा अपवाद वगळता सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यातही भारताने अटीतटीच्या लढतीत बाजी मारली. सध्या गुणतालिकेत भारतीय संघ ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताचा आगामी सामना विंडीजविरुद्ध मँचेस्टरच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मँचेस्टरला रवाना झाली आहे. या प्रवासादरम्यान कर्णधार विराट कोहलीने मराठमोळा खेळाडू केदार जाधवसोबतचा फोटो शेअर केला आहे.

वातावरण ढगाळ असलं तरीही केदार जाधवच्या हास्यामुळे दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली, अशा आशयाचा संदेश विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात केदार जाधवने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2019 8:20 pm

Web Title: cricket world cup 2019 virat kohli shares picture with kedar jadhav while travelling to manchester psd 91
टॅग Virat Kohli
Next Stories
1 FIH Series Finals : भारतीय महिलांची जपानवर ३-१ ने मात, पंतप्रधान मोदींनीही केलं अभिनंदन
2 पाकिस्तानी तोफखान्यासमोर आफ्रिकेचा गड ढासळला, शादाब-आमिर-वहाबचा भेदक मारा
3 World Cup 2019 : इम्रान ताहीरची गाडी सुसाट, पाकविरुद्ध सामन्यात विक्रमाची नोंद
Just Now!
X