News Flash

Ind vs Pak : विराटला मागे टाकत रोहित शर्माची बाजी, केली अनोख्या विक्रमाची नोंद

मानाच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने आपला फॉर्म कायम राखत पाकिस्तानविरुद्ध सामन्यातही शतकी खेळीची नोंद केली आहे. मँचेस्टरच्या मैदानात रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. आपल्या शतकी खेळीदरम्यान रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत, मानाच्या खेळाडूंच्या पंगतीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : साहेबांच्या देशात भारताच्या हिटमॅनचा पराक्रम, ‘गब्बर’ साथीदाराला टाकलं मागे

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त १२५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी पोहचला. रोहितने आतापर्यंत १५ वेळा १२५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यंत १३ वेळा अशी कामगिरी केली आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाने एकदाही भारतावर मात केली नाहीये. आतापर्यंतच्या लढतीमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध सहा सामने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ आपली ही विजयी परंपरा कायम राखतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 8:25 pm

Web Title: cricket world cup 2019 with help of century rohit sharma leaves behind captain virat kohli creates unique record psd 91
Next Stories
1 Ind vs Pak : साहेबांच्या देशात भारताच्या हिटमॅनचा पराक्रम, ‘गब्बर’ साथीदाराला टाकलं मागे
2 IND vs PAK : रोहितचा भीमपराक्रम! सचिन, विराटच्या पंगतीत मिळवले स्थान
3 Ind vs Pak : कर्णधार विराटने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम