28 October 2020

News Flash

धोनीच नव्हे तर या तीन खेळाडूंचाही हा अखेरचा विश्वचषक?

कदाचित या चौघांचा हा अखेरचा विश्वचषक असेल. 

संग्रहित फोटो

भारतीय संघातील दिग्गज खेळाडू एमएस धोनीचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो. धोनीचे वाढतेय वय पाहता २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धोनी आपल्याला खेळताना दिसणार नाही. धोनीनं सात जुलै रोजी ३८ व्या वर्षात पदार्पण केलं. पुढील विश्वचषकापर्यंत धोनीचे वय ४२ पार झालेलं असेल. त्यामुळे धोनी आगामी विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. धोनीनं भारतीय संघाला आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकदिवसीय सामन्याचा विश्वचषक, टी-२० चा विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजय मिळवून दिला. आयसीसीच्या तिन्ही चषकावर नाव कोरणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. उपांत्य सामन्यात भारताच्या पराभवानंतर पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेनं जोर धरला आहे. जाणकरांच्या मते धोनीचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो. पण धोनीशिवाय आणखी तीन खेळाडूंचाही हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो.

अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकही २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत संघात दिसण्याची शक्यता कमीच आहे. यंदाच्या विश्वचषकात कार्तिकला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. मिळालेल्या संधीचे सोनं त्याला करता आले नाही. पंतसारखे युवा यष्टीरक्षक खेळाडू असताना २०२३ मध्ये दिनेश कार्तिकची निवड होणं कठीण आहे. ३४ वर्षीय कार्तिक २०२३ च्या विश्वचषकात ३८ वर्षांचा होईल. वाढती स्पर्धा पाहता कार्तिकला संघात स्थान मिळणं कठीण आहे.

कार्तिकनंतर दुसरा अनुभवी खेळाडू ३४ वर्षीय केदार जाधवसाठीही भारतीय संघातील दरवाजे काही दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे. जाधवने यंदाच्या विश्वचषकात निराशजनक कामगिरी केली. जाधवला सहा सामन्यात फक्त ८० धावा करता आल्या. त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसचे गोलंदाजीमध्ये त्याला एकही बळी घेता आला नाही. त्यामुळे केदार जाधवचा भारतीय संघातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पुढील विश्वचषकापर्यंत केदार जाधव ३८ वर्षांचा होईल.

सलामिवीर फलंदाज शिखर धवनही वाढत्या वयामुळे २०२३ मध्ये भारतीय संघात दिसण्याची शक्यता धुसूर आहे. शिखर धवनचे सध्याचे वय ३३ आहे. एकूणच स्पर्धा पाहता धवनला आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. तसेच पृथ्वी शॉ सारखा तगडा युवा सलामिवीर फलंदाज तयार होत असताना शिखर धवन आपले स्थान कितपत टिकवू शकतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी विश्वचषकात शिखर धवनचे वय ३७ वर्ष होणार आहे. भारतीय संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी शिखरला आपल्या फलंदाजीसोबत फिटनेसवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

आयपीएलमुळे वाढलेली स्पर्धा, वाढते वय आणि फिटनेसचा विचार करता धोनी, कार्तिक, जाधव, शिखर धवन आपल्याला पुढील विश्वचषक स्पर्धेत कदाचीत दिसणार नाही.  कदाचीत या चौघांचा हा अखेरचा विश्वचषक असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 2:17 pm

Web Title: cricket world cup dhoni and this 3 india cricketer may be played last world cup tournament nck 90
Next Stories
1 WC 2019 : भारताच्या पराभवावर शोएब अख्तर म्हणतो…
2 World Cup 2019 : विराटने शास्त्रींचं ऐकलं नाही आणि सामना गमावला
3 WC 2019 : ‘आम्ही अपयशी ठरलो’; हिटमॅनची प्रामाणिक कबुली
Just Now!
X