रविवार ३० जून रोजी भारत-इंग्लंड यांच्यात होणारा सामना लहान मुलांसाठी खास असणार आहे. ‘आयसीसी’च्या ‘#वन डे फॉर चिल्ड्रन’ या मोहिमेंतर्गत काही बालकांना ‘बॉल बॉय’ची भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे. तसेच सामन्याच्या पूर्वसंध्येला होणारी कर्णधारांची पत्रकार परिषद, सामन्याचे समालोचन आणि खेळाडूंसोबत मुलाखती आणि सामन्यानंतर खेळाडूंशी संवाद साधण्याचीही संधी मुलांना मिळणार आहे. ‘आयसीसी’ने मंगळवारी हे जाहीर केल्यामुळे अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या बालकांमध्ये भारतीय वशांच्या अ‍ॅना या आठ वर्षीय मुलीचासुद्धा सहभाग आहे. लहान मुलांमध्ये क्रिकेटविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी आणि भविष्याच्या दृष्टीने त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.