News Flash

‘या’ क्रिकेटपटूला प्रेयसीनेच दुसऱ्या तरुणीबरोबर सेक्स करताना रंगेहाथ पकडले आणि…

तिने त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर ती ढसाढसा रडली

प्रेयसीनेच क्रिकेटपटूला रंगेहाथ पकडले

क्रिकेटच्या मैदानाबाहेर अनेकदा वादात राहणारा खेळाडू म्हणजे इंग्लंडच्या संघातील अ‍ॅलेक्स हेल्स. ऐन विश्वचषकाआधीच उत्तेजक सेवन केल्यामुळे स्पर्धेला मुकलेला हेल्स पुन्हा अडचणीत आला आहे. मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणारी हेल्सची प्रेयसी डॅनी गिसबोर्न त्याला सोडून गेली आहे. हेल्स डॅनीला डबल डेट करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तीने त्याला दुसऱ्या तरुणीसोबत सेक्स करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिने हेल्सबरोबरचे तीन वर्षांपासून सुरु असणारे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.

ऑक्टोबर महिन्यामध्ये हेल्स हा कॅरेबियन बेटांवर सुट्ट्यांसाठी गेला होता. त्यावेळी डॅनीही त्याच्याबरोबर गेली होती. हेल्स हा कायमच इतर स्त्रीयांवर डोळा ठेऊ असल्याचे डॅनीला ठाऊक होते. मागील वर्षी तिने त्याला शेवटची संधी म्हणून माफही केले होते. त्यानंतरही हेल्सच्या वर्तवणुकीमध्ये सुधारणा झाली नाही. तरीही २६ वर्षीय डॅनी त्याच्याकडे कानाडोळा करत राहिली.

 

View this post on Instagram

 

And congrats to @dannigisbourne for still punching above her weight

A post shared by Alex Hales (@alexhales1) on

कॅरेबियन बेटांवर सुट्टीमध्ये हेल्सच्या जवळच्या व्यक्तीने तिला तो एका महिलेबरोबर तुला डबल डेटिंग करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर डॅनीने हेल्सला एका तरुणीबरोबर सेक्स करताना रंगेहाथ पकडले. अनेकदा संधी देऊनही हेल्सने आपला विश्वासघात केल्याचे समजल्यानंतर ती ढसाढसा रडली आणि तातडीने कॅरेबियन बेटांवरुन मायदेशी निघून गेली.

 

View this post on Instagram

 

Halloween

A post shared by Alex Hales (@alexhales1) on

डॅनीने अनेकदा हेल्सला माफ केले. मात्र कॅरेबियन बेटांवर घडलेल्या प्रकारानंतर तिला पुन्हा पुन्हा हेल्सने चुका करणे आपण त्याला माफ करणे चुकीचे असल्यासारखे वाटले. त्यामुळेच तीने हा निर्णय घेतल्याची माहिती एका निकटवर्तीयाने दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alex Hales (@alexhales1) on

 

View this post on Instagram

 

Throwback to one of the best weekends! @dannigisbourne #shespunching

A post shared by Alex Hales (@alexhales1) on

या संपूर्ण प्रकरणामुळे डॅनीच्या घरच्यांनाही धक्का बसल्याचे समजते. हेल्स आणि डॅनी अनेक कार्यक्रमांना एकत्र दिसायचे. मात्र हेल्स असं काही करेल असं डॅनीच्या घरच्यांना वाटले नव्हते. मागील तीन वर्षांपासून एकमेकांबरोबर असणाऱ्या हेल्स आणि डॅनीचे नाते संपुष्टात आल्याने त्यांना धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

Amazing day at @jadedernbach wedding! Same suit as last week but there we go

A post shared by Alex Hales (@alexhales1) on

 

View this post on Instagram

 

Amazing day at the Winter-Roy wedding!

A post shared by Alex Hales (@alexhales1) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Alex Hales (@alexhales1) on

सहा महिन्यापूर्वी शेवटचा सामना खेळेल्या हेल्सचा क्रिकेटमधील प्रवास अडखळत सुरु असतानाच आता या खासगी कारणामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. डॅनी सोडून जाणे हा हेल्ससाठी मोठा धक्का असल्याचे त्याच्या जवळचे लोक सांगतात. मात्र डॅनीने घेतलेल्या या निर्णयाला हेल्सची वर्तवणुकच कारणीभूत असल्याचेही ते मान्य करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 10:15 am

Web Title: cricketer alex hales was dumped by his gorgeous girlfriend for cheating scsg 91
Next Stories
1 वेळेवर भत्ता न मिळाल्यामुळे भारतीय महिला संघ अडचणीत
2 दिल्लीचा सामना रद्द करणे अशक्य -गांगुली
3 ठाणे कबड्डीच्या वर्चस्वासाठी ३३ उमेदवार रिंगणात
Just Now!
X