भारताचा दिग्गज माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीपूर्वी दिनेश कार्तिकने २००४मध्ये पदार्पण केले होते. नंतर तो भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्यात अपयशी ठरला. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक चढ-उतार होते. अनेक सामन्यातून त्याने उत्तम प्रदर्शन केले. परंतु काही काळानंतर त्याचा फॉर्म गेला. २०१९च्या एकदिवसीय वर्ल्डकपनंतरही त्याच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. परंतू  कार्तिकने आपले ध्येय अजूनही सोडलेले नाही. आगामी दोन टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबत कार्तिकने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – आपल्याच संघातील खेळाडूला ‘कानशिलात’ लगावलेल्या ३४ वर्षीय क्रिकेटपटूचं पुनरागमन!

एका मुलाखतीत कार्तिक म्हणाला, ”तुमचे वय न बघता, तुम्ही किती तंदुरुस्त आहात, हे निवडकर्त्यांना पाहायचे असते. जर तुम्ही फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली, तर तुम्ही देशासाठी खेळायला तयार आहात. टी-२० वर्ल्डकपमध्ये देशाकडून खेळण्याचे माझे लक्ष्य आहे. यावर्षी आणि पुढच्या वर्षी टी-२० वर्ल्डकप होणार आहे, त्यामध्ये भाग घेण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

कार्तिक म्हणाला, ”मला माहित आहे, की मी यापूर्वी खरोखर चांगली कामगिरी केली आहे. एकदिवसीय वर्ल्डकपनंतर मला वगळले गेले होते, तेव्हा मला वाटले, की मी टी-२० मध्ये भारतासाठी चांगले काम केले आहे, परंतु वर्ल्डकप माझ्यासाठी चांगला गेला नाही आणि मी टी-२० संघातूनही बाहेर फेकलो गेलो.”

हेही वाचा – ‘‘सचिननं मला सामना गंभीरतेनं खेळू नकोस असं सांगितलं होतं”

आयपीएलच्या १४व्या हंगाम कार्तिक कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. त्याला अपेक्षेनुसार चांगली कामगिरी करता आली नाही. करोनामुळे आयपीएल २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आले, मात्र उर्वरित सामने आता यूएईत होणार आहेत. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपपूर्वी कार्तिकला आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन करावे लागेल, जेणेकरून निवडकर्ते त्याच्या नावाचा विचार करू शकतील.