भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी एका गंभीर आजाराशी झुंज देणार्‍या ३ वर्षाच्या मुलीला मदत करण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. या मुलीचे नाव सान्वी असून तिला १६ कोटींच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. हनुमा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”३ वर्षांची सान्वी स्पायनल मस्क्यूलर एट्रोफी नावाच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहे आणि तिला इंजेक्शनची आवश्यकता आहे, ज्याची किंमत १६ कोटी आहे. एक किंवा दोन जणांच्या मदतीने हे शक्य होणार नाही. यासाठी सर्वांनाच पुढे यावे लागेल.” हनुमाच्या आवाहनानंतर अश्विनने त्याचे ट्वीट रिट्वीट केले. ”चला प्रयत्न करु आणि मदत करू. आपल्याला जे जे शक्य आहे ते द्या”, असे अश्विनने म्हटले. या दोघांनंतर बरेच खेळाडूही मदतीसाठी पुढे आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने लोकांचा जीव वाचवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. हनुमाच्या आवाहनानंतर दोन तासांत ७० हजारांहून अधिक रुपये जमा झाले.  

हेही वाचा – WTC FINAL मधील पराभवानंतर टीम इंडिया असणार हॉटेलमध्ये बंद? काही महिन्यांपूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांनी अयांश गुप्ता या लहान मुलाचे आयुष्य वाचवले होते. या मुलास जगातील सर्वात महागड्या औषधाची गरज होती, ज्याची किंमत जवळजवळ १६ कोटी होती. अयांशच्या आई-वडिलांनी मुलाच्या उपचारासाठी निधी गोळा करण्यासाठी ‘AyaanshFightsSMA’ नावाचे ट्विटर अकाउंट तयार केले होते.