हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकट टीमचा ऑल राऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. हार्दिक नेहमीच त्याच्या ट्रेनिंग सेशनचे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. मात्र आता हार्दिकने ट्रेनिंगचे नाही तर एक त्याच्या लहानपणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हार्दिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हार्दिकने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिकचा क्रिकटेमधील संपूर्ण प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडीओत हार्दिकची एक खूप जुनी मुलाखत आहे. ही मुलाखत हार्दिकच्या लहानपणीची असल्याचे दिसते. व्हिडीओत हार्दित कोणत्या तरी लोकल चॅनलला मुलाखत देत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओत हार्दिक बोलतो, “माझं पण एक स्वप्न आहे. ज्याप्रमाणे इरफान पठाण आणि युसूफ पठाण बडोदा आणि टीम इंडियासाठी खेळतात. त्याच प्रमाणे आम्ही दोघे सुद्धा बडोदा आणि इंडियासाठी खेळू.”

हा व्हिडीओ शेअर करत, “आपल्या स्वप्नांना कधीच कमी लेखू नका. #IPL Auctionमुळे मला नेहमीच क्रिकेटमधील आमच्या प्रवासाची आठवण होते” अशा आशयाचे कॅप्शन हार्दिकने दिले आहे. हार्दिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ४१ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे दोघे भाऊ आहेत. हे दोघे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या टीमसाठी बऱ्याच वर्षांपासून खेळत आहेत. २०१५ मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये आला होता. कृणाल पांड्या २०१६मध्ये मुंबई इंडियन्समध्ये आला. मुंबई इंडियन्सला चॅंमपियन बनवण्यात दोघांचा मोलाचा वाटा आहे.