News Flash

असा दिसतो ज्युनिअर पांड्या, हार्दिकने पोस्ट केला बाळाचा Cute फोटो

आई-बाबा झाल्याची ट्विटद्वारे दिली होती माहिती

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेन्ड नताशा स्टँकोविच यांना ३० जुलै रोजी पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं होतं. लॉकडाउन काळात हार्दिकने नताशा गर्भवती असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांनी ही गोड बातमी सांगितली. आता त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.

हार्दिकनं ही आनंदाची बातमी दिल्यानंतर बीसीसीआयनंदेखील त्याचं अभिनंदन केलं होतं. तसंच सर्व खेळाडू आणि हार्दिकच्या चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यानंतर आता त्यानं आपल्या बाळासह रुग्णालयातील एक फोट शेअर केला आहे. देवाकडून आम्हाला मिळालेलं सुंदर गिफ्ट असं कॅप्शनही त्यानं या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

The blessing from God @natasastankovic__

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकने लॉकडाउनमध्ये आपली गर्लफ्रेन्ड नताशा गर्भवती असल्याची बातमी दिली होती. तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. “मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गर्भवती असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत”, अशा भावना हार्दिकने व्यक्त केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:36 pm

Web Title: cricketer hardik pandya shares his baby pic on instagram says gods gift jud 87
Next Stories
1 एका वर्षात ३०० पेक्षा अधिक चौकार, फक्त एकाच भारतीय खेळाडूला जमलाय हा विक्रम !
2 गौतम गंभीरचं कौतुकास्पद पाऊल, घेतली सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
3 ‘आयपीएल’साठी प्रेक्षकांना परवानगी?
Just Now!
X