News Flash

मेहुणीने घेतली इशांत शर्माची फिरकी

प्रशांतीच्या प्रश्नावर इशांतची 'बोलतीबंद'

सोशल मीडियावर इशांत-प्रतिमाच्या या फोटोची चर्चा

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज इशांत शर्माची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी तो क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीमुळे नाही, तर पत्नीच्या बहिणीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तो प्रकाशझोतात आलायं. काही दिवसांपूर्वीच इशांतने पत्नीसोबत मालदिवमध्ये वेळ घालवला. इशांतची पत्नी प्रतिमाने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन त्यावेळीचे काही आनंदी क्षण फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केले. त्यातील एका फोटोवर प्रतिक्रिया देत मेहुणीने इशांतची फिरकी घेतली. इशांतची पत्नी प्रतिमाने बोटींग करतानाचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. इशांतच्या चाहत्यांसह अनेकांनी जोडी सुंदर दिसते, अशा प्रतिक्रिया दिल्या.

मात्र, इशांतच्या मेहुणीची प्रतिक्रिया चांगलीच लक्षवेधी ठरताना दिसते. तिने इशांतवर बाऊन्सरचा माराच केलाय. ‘मालदिवला जाऊन तुमच्या दोघांचा चेहरा खूपच काळा पडला आहे, जर सूर्य नसता तर तुम्ही दिसलाच नसता’, अशी प्रतिक्रिया प्रशांतीने दिली. तिच्या या प्रतिक्रियेनंतर इशांतने हजरजबाबीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. ‘काळे होण्यासाठी लोक मेहनत घेतात, आम्ही आनंद घेताना काळे पडलोय’, असे उत्तर त्याने दिले. यावर प्रशांतीने पुन्हा इशांतची फिरकी घेतली. ‘काळे होण्यात आनंद आहे, तर गोरे होण्यासाठी क्रिमचा वापर कशाला करतोस? असा प्रतिप्रश्न तिने केला. प्रशांतीच्या या प्रश्नावर इशांतने माघार घेतली.

इशांत शर्मा क्रिकेटच्या मैदानावरील खेळाव्यतिरिक्त लांब केसामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथसोबत त्याची जुंपली होती. दोघांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. यावेळी इशांतने स्टिव्ह स्मिथची केलेली नक्कल सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 9:24 pm

Web Title: cricketer ishant sharma trolled by his sister in law prashanti singh
Next Stories
1 धोनी विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर
2 भारताच्या ६ फलंदाजांना गारद करणारा धनंजय २४ तासांपूर्वीच अडकला होता लग्नाच्या बेडीत
3 सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X