News Flash

क्रिकेटपटूने केली करोनावर मात, पत्नी अद्यापही करोनाग्रस्त

दोन आठवड्यांपूर्वी पत्नीला करोनाची लागण

करोनामुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. दररोज भयावह आकडे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक देश आपल्या परीने या विषाणूचा सामना करत आहेत. कडक नियम आणि उपाययोजना यांच्या आधारे देशातील करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सर्वत्र सुरू आहे. याच दरम्यान, एक दिलासादायक बातमी अशी की बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मोर्ताझा हा करोनामुक्त झाला आहे. २० जूनला तो करोनाग्रस्त झाला होता. पण त्याची पत्नी मात्र अद्यापही करोनाग्रस्त असल्याची माहिती त्याने दिली आहे.

मोर्ताझाला करोना विषाणूची लागण झाली होती. काही दिवसांपासून मश्रफीची तब्येत ठीक नव्हती, यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने करोनाची चाचणी करुन घेतली. तेव्हा २० जूनला त्याच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने स्वतःला घरातच क्वारंटाइन करुन घेतलं होतं. आणि सुदैवाने तो आता करोनामुक्त झाला आहे. “सगळे तंदुरूस्त आहात अशी आशा करतो. देवाच्या कृपेने आणि तुम्हाला साऱ्यांच्या आशीर्वादाने माझा करोनाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व चाहत्यांचा मी ऋणी आहे”, असे ट्विट करत त्याने माहिती दिली.

“मी घरातच राहून या करोना विषाणूच्या कचाट्यातून मुक्त झालो. ज्यांना करोनाची लागण झाली आहे त्यांनी खचून जाऊ नका. सकारात्मक राहा. देवावर विश्वास ठेवा आणि नियमांचे पालन करा. आपण एकत्रितपणे या विषाणूचा सामना करूया. दोन आठवड्यापूर्वी माझ्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ती अद्यापही करोनामुक्त झालेली नाही. पण तिची प्रकृती सुधारते आहे आणि तिच्या तंदुरूस्तीसाठीही साऱ्यांनी प्रार्थना करा”, असेदेखील त्याने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:10 pm

Web Title: cricketer mashrafe mortaza free from corona but wife still covid 19 positive vjb 91
Next Stories
1 ‘धोनीने भारताला काय दिलं?’ विचारणाऱ्या गंभीरला मिळालं सडेतोड उत्तर
2 ऑस्ट्रेलियात पुन्हा विजय हवाच!
3 विंडीजच्या विजयापर्यंत खेळपट्टीवर न टिकल्याची ब्लॅकवूडला खंत
Just Now!
X