08 March 2021

News Flash

IPL 2017: दिल्ली संघातील ऋषभ पंतच्या वडिलांचे आकस्मिक निधन

ऋषभचे वडील ५३ वर्षांचे होते

वडिलांच्या निधनामुळे ऋषभ पंत आयपीएलमधील समावेशाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

भारताचा युवा खेळाडू आणि आयपीएलमध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडून खेळण्यासाठी सज्ज असलेल्या ऋषभ पंत याच्या वडिलांचे बुधवारी रात्री आकस्मिक निधन झाले. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच ऋषभ थेट घरी रवाना झाला. वडिलांच्या निधनामुळे ऋषभ पंत आयपीएलमधील समावेशाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ८ एप्रिलला दिल्लीचा पहिला सामना खेळविण्यात येणार आहे. पण पितृशोकामुळे ऋषभ आता खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

ऋषभचे वडील ५३ वर्षांचे होते. बुधवारी रात्री ९ वाजता ऋषभची आई सरोज पंत या त्यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांनी बराच वेळ काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना त्वरित नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ऋषभला याची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपल्या संघ व्यवस्थापनाला याची कल्पना देऊन तो घरी परतला. गुरुवारी हरिद्वार येथे ऋषभच्या वडीलांवर अत्यसंस्कार करण्यात आले.

नुकतेच काही महिन्यांपू्र्वी रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना ऋषभने दमदार कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर त्याच्याकडून आयपीएलमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण पितृशोकामुळे ऋषभच्या खेळण्याबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 5:15 pm

Web Title: cricketer rishabh pant father passed away
Next Stories
1 IPL 2017 : ड्वेन ब्राव्होची ‘क्यूट फ्रेंड’ अनुषा दांडेकर
2 मिसबाह-उल-हकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
3 युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या लालरिंन्नुन्गाला रौप्य पदक
Just Now!
X