News Flash

माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या पत्नीची आत्महत्या

माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाची पत्नी परिणिती अंकोला हिने पुण्यातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

| December 23, 2013 04:12 am

माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाची पत्नी परिणिती अंकोला हिने पुण्यातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मी माझ्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करते आहे. असे परिणितीने मृत्युपूर्वी लिहून ठेवले आहे.
पण सलीलसोबत असलेल्या वादामुळे तिचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले आणि तिने आत्महत्या केल्याचा आरोप परिणितीच्या आई-वडिलांनी केला आहे. सलील अंकोलाची पत्नी परिणिती गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील सालसबरी पार्क येथील सीता सोसायटीत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. आई-वडिल घरी नसतानां परिणितीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकून आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 4:12 am

Web Title: cricketer salil ankolas ex wife commits suicide
Next Stories
1 थरार!
2 २०२२ फिफा विश्वचषकासाठी भारत पात्र ठरेल
3 जलतरणपटूंचे जिवाचे मालवण
Just Now!
X