News Flash

OMG..! वॉशिंग्टन सुंदरच्या पाळीव कुत्र्याचं नाव वाचून तुम्हालाही येईल हसू!

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून वॉशिंग्टनची ओळख

वॉशिंग्टन सुंदर

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरसाठी मागील काही दिवस सुंदर स्वप्नांसारखे होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. युवा वॉशिंग्टनने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात त्याने 4 गडी बाद केले आणि फलंदाजीत 62 धावांची खेळी साकारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तब्बल 32 वर्षानंतर भारताने गाबा मैदानावर कसोटी विजय नोंदवला. त्या सामन्याला कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासाठी वॉशिंग्टनने एक मजेशीर गोष्ट केली आहे.

वॉशिंग्टनने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव गाबा ठेवले आहे. ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून हे नाव ठेवले असल्याचे त्याने सांगितले. आयपीएलचा चौदावा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा वॉशिंग्टन संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. पॉवरप्लेमध्ये कमी वेगाने गोलंदाजी आणि अंतिम षटकात स्फोटक फलंदाजी करण्यासाठी वॉशिंग्टन सक्षम मानला जातो.

 

आयपीएलच्या उद्धाटनाचा पहिला सामना 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. चेन्नईच्या चिदम्बरम मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी वॉशिंग्टनचे आरसीबी संघातील अंतिम अकरामधील स्थान पक्के मानले जात आहे.

संघ पुढीलप्रमाणे –  विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्ड्सन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, फिन एलन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, अ‍ॅडम झम्पा, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डॅनियल ख्रिश्चन, के. एस. भरत, सुयेश प्रभुदेसाई, डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 11:08 am

Web Title: cricketer washington sundar names his pet dog after gabba adn 96
Next Stories
1 IPL 2021 : मोईन अलीने खेळण्यास नकार दिल्यामुळे धोनीच्या चेन्नईने ‘तो’ लोगो हटवला? CSK ने दिलं स्पष्टीकरण
2 ‘आयपीएल’चे सामने मुंबईतच – सौरव गांगुली
3 कर्फ्युचा संघांच्या प्रवासावर परिणाम नाही : बीसीसीआय अधिकारी
Just Now!
X