28 February 2021

News Flash

२०१९ला युवराज सिंग क्रिकेट कारकिर्दीसंदर्भात घेणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय निपुण असणाऱ्या या खेळाडूच्या चाहत्यांचा आकडाच त्याच्या लोकप्रियतेविषयी सारंकाही सांगून जातो.

युवराज सिंग

भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या युवराज सिंग याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बरीच वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या युवराजने आपल्या करिअरविषयी २०१९ या वर्षअखेरीस महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. त्याचा हा महत्त्वाचा निर्णय निवृत्तीकडे इशारा करत आहे.

‘एएनआय’ने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. ‘मी त्या वर्षाच्या अखेरीस हा सर्वस्वी महत्त्वाचा असा निर्णय घेईन. प्रत्येकाला कधी ना कधी हा निर्णय घ्यावा लागणारच आहे. जवळपास २००० सालपासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्या गोष्टीला आता १७- १८ वर्षे झाली. त्यामुळे आता २०१९च्याच अखेरी त्याविषयीच्या निर्णय घेईन’, असं युवी म्हणाला.
युवराजने केलेलं हे वक्तव्य पाहता सध्या क्रीडारसिकांमध्ये काहीशी निराशा पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट संघासमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात बरीच आव्हानं असल्याच्या दिवसांमध्ये युवराज सिंगने स्वत:ला सिद्ध केलं होतं. युवराजला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवून देण्यामध्ये सौरव गांगुलीलाही तितकंच श्रेय देण्यात येतं. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय निपुण असणाऱ्या या खेळाडूच्या चाहत्यांचा आकडाच त्याच्या लोकप्रियतेविषयी सारंकाही सांगून जातो.

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

आजवरच्या कारकिर्दीत युवराजने अनेकदा अफलातून खेळी करत क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. त्याची अशीच एक अविस्मरणीय खेळी म्हणजे २००७ मधील टी२० विश्वचषकातील ती फटकेबाजी. एका षटकामध्ये असणाऱ्या सहाही चेंडूंवर युवराजने षटकार ठोकत संघाच्या धावसंख्येत ३६ धावांची भर घातली होती. त्याची ही इनिंग क्रिकेटच्या इतिहासात कायमच प्रशंसनीय ठरली यात शंका नाही. क्रिकेट विश्वात स्वत:ला सिद्ध करणाऱ्या युवराजने एक व्यक्ती म्हणूनही नेहमीच सर्वांची मनं जिंकली. कर्करोगावर मात करत त्याने क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं. त्यासोबतच कर्करोग ग्रस्तांसाठी त्याने सढळ हातांनी मदती केली. असा या सर्वांचा आवडता स्टार खेळाडू त्याच्या करिअरविषयी नेमका कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार, याकडेच आता क्रीडारसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 11:19 am

Web Title: cricketer yuvraj singh discloses he will take final call on his career after 2019
Next Stories
1 बांगलादेशाच्या महिला क्रिकेटपटूकडे सापडल्या १४ हजार नशेच्या गोळ्या
2 बार्सिलोनाचा जेतेपदाचा चौकार!
3 ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!
Just Now!
X