07 August 2020

News Flash

मेस्सी-रोनाल्डोमध्ये ‘बॅलोन डी’ओर’ पुरस्कारासाठी चुरस

माद्रिदचा करीम बेंझेमा व गॅरेथ बॅले आणि बार्सिलोनाचा नेयमार व लुईस सुआरेज हेही शर्यतीत आहेत

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी यांच्यात यंदाही जगातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूच्या ‘बॅलोन डी’ओर’ पुरस्कारासाठी चुरस रंगणार आहे.

रिअल माद्रिदचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी यांच्यात यंदाही जगातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूच्या ‘बॅलोन डी’ओर’ पुरस्कारासाठी चुरस रंगणार आहे.
या दोघांव्यतिरिक्त माद्रिदचा करीम बेंझेमा व गॅरेथ बॅले आणि बार्सिलोनाचा नेयमार व लुईस सुआरेज हेही शर्यतीत आहेत. रोनाल्डोने नुकताच माद्रिदसाठी सर्वाधिक ३२४ गोल करण्याचा विक्रम नोंदवला असून सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार उंचावण्यासाठी तो आतुर आहे. रोनाल्डोला चार वेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या मेस्सीचे कडवे आव्हान आहे. बार्सिलोनाने गतवर्षी ला लिगा, चॅम्पियन्स लीग आणि स्थानिक चषक स्पर्धाचे जेतेपद पटकावले असून या पुरस्कारासाठी क्लबमधील सर्वाधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) संभाव्य २३ जणांची नावे जाहीर केली. अँड्रेस इनिएस्ता, झेव्हिएर मास्केरानो आणि इव्हान रॅकिटिक या बार्सिलोनाच्या खेळाडूंचा, तर माद्रिदच्या जेम्स रॉड्रिग्स्, टोनी क्रूस यांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 2:39 am

Web Title: cristiano ronaldo and lionel messi headline ballon dor shortlist
Next Stories
1 ऑस्कर पिस्टोरिअसची पॅरोलवर सुटका
2 सामनानिश्चिती प्रकरणाचा रिकी पॉन्टिंग साक्षीदार
3 इंडियन सुपर लीग : नाटय़मय लढतीत युनायटेडचा चेन्नईयनवर विजय
Just Now!
X