24 February 2021

News Flash

रोनाल्डो दुसऱ्यांदा युरोपातील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी

रिअल माद्रिदचा अव्वल दर्जाचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला युरोपियन फुटबॉल महासंघातर्फे दिला

| August 27, 2016 02:53 am

रिअल माद्रिदचा अव्वल दर्जाचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला युरोपियन फुटबॉल महासंघातर्फे दिला जाणारा सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला आहे. कारकीर्दीत दुसऱ्यांदा त्याला हा मान मिळाला आहे.

रोनाल्डोने रिअल माद्रिदमधील त्याचा सहकारी गॅरेथ बॅले व अ‍ॅटेलिटिको माद्रिदचा खेळाडू अन्तोनी ग्रिझमन यांना मागे टाकून हा पुरस्कार मिळवला. रोनाल्डोने यापूर्वी २०१३-१४मध्ये हा पुरस्कार मिळवला होता.

‘‘पुन्हा हा सन्मान मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. मात्र गॅरेथ व ग्रिझमन हेदेखील अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत,’’ असे रोनाल्डोने सांगितले. रिअल माद्रिद संघाने मे महिन्यात ११व्यांदा युरोपियन चषक जिंकला होता. त्यावेळी अंतिम फेरीत त्यांनी अ‍ॅटेलटिको संघाला पेनल्टी शूटआऊटद्वारे हरवले होते. त्यामध्ये रोनाल्डोने विजयी गोल केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 2:53 am

Web Title: cristiano ronaldo named uefa best player of europe
Next Stories
1 डिसेंबरमध्ये गामा कुस्ती विश्वचषकाची रंगत
2 ऐतिहासिक कामगिरीची सेरेनाला संधी
3 इंडिया रेडचा दणदणीत विजय
Just Now!
X