चॅम्पियन्स लीग फुटबॉल : युव्हेंट्सचे आव्हान संपुष्टात

तुरिन : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे युव्हेंट्सने २-१ असा विजय मिळवला असला तरी पहिल्या सामन्यातील पराभवामुळे लिऑनने त्यांचे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.

शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात रोनाल्डोने ४३व्या मिनिटाला पेनल्टीवर आणि ६०व्या मिनिटाला गोल करत युव्हेंट्सला विजय मिळवून दिला. पण उपांत्यपूर्व फे री गाठण्यात त्यांना अपयश आले. लिऑनने एकू ण २-२ अशा गोलफरकासह प्रतिस्पध्र्याच्या मैदानात अधिक गोल के ल्यामुळे उपांत्यपूर्व फे रीत मजल मारली.

लिऑनचा गोलरक्षक अँथनी लोपेस याने विजयानंतर आनंद व्यक्त के ला. तो म्हणाला, ‘‘विजयासाठी प्रतिस्पध्र्यानी अथक परिश्रम घेतले. सांघिक कामगिरीचे फळ मिळाल्याने आम्हाला अधिक आनंद होत आहे. या स्पर्धेत विजेतेपदापर्यंत मजल मारण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’

लिऑनला आता उपांत्यपूर्व फे रीत मँचेस्टर सिटीशी लढत द्यावी लागेल. मँचेस्टर सिटीने रेयाल माद्रिदचा २-१ असा पाडाव करून ४-२ अशा गोलफरकासह आगेकू च के ली. १३ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रेयाल माद्रिदला बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे आता आपणच विजेते होऊ, असा विश्वास मँचेस्टर सिटीच्या खेळाडूंना वाटत आहे. रेयाल माद्रिदच्या बचावपटूंच्या चुकांमुळे रहिम स्टर्लिग आणि गॅब्रियल जिजस यांना गोल करण्याची संधी मिळाली.

‘‘रेयाल माद्रिद हा स्पेनमधील अव्वल क्लब म्हणून ओळखला जातो. चॅम्पियन्स लीगमध्ये त्यांनी नेहमीच चांगली कामगिरी के ली आहे. त्यामुळेच अशा बलाढय़ क्लबला हरवल्यामुळे आमचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे,’’ असे गॅब्रियल जिजसने सांगितले.