News Flash

रोनाल्डोच्या दुसऱ्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्हच !

बार्सिलोनाविरुद्ध सामन्याला मुकण्याची शक्यता

क्रिस्टियानो रोनाल्डो

पोर्तुगालचं प्रतिनिधीत्व करणारा जगविख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तिआनो रोनाल्डोची दुसऱ्यांना करोना चाचणी घेण्यात आली आहे. दुर्दैवाने या चाचणीचा अहवालही पॉझिटीव्ह आल्यामुळे पुढचे काही दिवस रोनाल्डोला क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. यामुळे Juventus फुटबॉल क्लबचं प्रतिनिधीत्व करणारा रोनाल्डो पुढील आठवड्यात मेसीच्या बार्सिलोनाविरुद्ध रंगणाऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. पोर्तुगालच्या संघाकडून खेळत असताना रोनाल्डोची करोना चाचणी करण्यात आली होती, ज्यात १३ ऑक्टोबररोजी त्याला विषाणूची लागण झाल्याचं समजलं होतं.

पोर्तुगालमधील स्थानिक वृत्तपत्र Correio da Manha ने दिलेल्या वृत्तानुसार, रोनाल्डोमध्ये करोनाची लक्षण कमी होत आलेली असली तरीही त्याचा अहवाल अजुनही पॉझिटीव्हच आलेला आहे. त्यामुळे चॅम्पिअन्स लिग स्पर्धेत बार्सिलोनाविरुद्ध सामन्यात रोनाल्डो खेळू शकणार नाहीये. डॉक्टरांनी पुढचे काही दिवस रोनाल्डोला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रोनाल्डो आणि मेसी यांच्यात मैदानात रंगणारं युद्ध पाहण्यासाठी कोट्यवधी फुटबॉलप्रेमी आतूर असतात. मात्र यंदा त्यांना या द्वंद्वाला मुकावं लागणार आहे.

UEFA च्या नवीन नियमांनुसार एका सामन्याआधी किमान आठवडाभर खेळाडूची करोना चाचणी निगेटीव्ह येणं अपेक्षित आहे. अशाच खेळाडूंचा संघात निवडीसाठी विचार केला जाईल. मात्र Juventus संघाने रोनाल्डोच्या पुनरागमनाबद्दलच्या आशा अद्याप सोडल्या नसून तो लवकरच पुनरागमन करेल अशी संघाला आशा आहे. बार्सिलोनाविरुद्ध सामन्याआधी ४८ तास आधी रोनाल्डोची पुन्हा करोना चाचणी करवून घ्यावी, जेणेकरुन त्याला बार्सिलोनाविरुद्ध सामन्यात सहभागी होता होईल अशी विनंती Juventus चा संघ UEFA कडे करणार आहे. त्यामुळे UEFA ही विनंती मान्य करतं का याकडे सर्व फुटबॉलप्रेमींचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 7:24 pm

Web Title: cristiano ronaldo tests positive for covid 19 for 2nd time could miss clash against lionel messis barcelona psd 91
Next Stories
1 भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शिक्कामोर्तब, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर
2 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेडचे विजय
3 औरंगाबादच्या हॉकीपटू भावंडांचा बुडून मृत्यू
Just Now!
X