फुटबॉल विश्वचषक २०१४ पात्रता फेरीच्या सामन्यात विश्वविजेत्या स्पेनने फिनलंडवर २-० अशी मात केली. १९व्या मिनिटाला सेक फॅब्रेगासच्या सुरेख पासवर जॉर्डी अल्बाने गोल करत स्पेनचे खाते उघडले. गोल करण्याची संधी फिनलंडलाही मिळाली मात्र त्यांना त्याचा उपयोग करुन घेता आला नाही. सामना संपायला चार मिनिटे असताना स्पेनच्या अल्वारो नेग्रेडोने गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पेनचे प्रशिक्षक विन्सेंट डेल बॉस्क्यू यांनी इकर कॅसिलसवर विश्वास ठेवत त्याला संघात कायम ठेवले. सर्जिओ रामोसतर्फे होणारा स्वयंगोल रोखत कॅसिलसने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बॉस्क्यू यांनी कोके आणि मारिओ सुआरेझ यांना पदार्पणाची संधी दिली. सुआरेझने चेंडूवर सर्वाधिक काळ नियंत्रण ठेवत फिनलंडला गोल करण्याची संधी मिळू दिली नाही. आय गटात स्पेन फ्रान्सच्या तीन गुणांनी पिछाडीवर आहे. फ्रान्स आणि जॉर्जिआ यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली होती.
* इटलीच्या विजयात गिलार्डिनो चमकला
अल्बटरे गिलार्डिनोच्या गोलच्या जोरावर इटलीने बल्गेरियावर १-० असा विजय मिळवला. सेझर प्रान्डेली यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इटलीच्या संघाने ब गटात या विजयासह सात गुणांची आघाडी मिळवली आहे. त्यांचे अजूनही तीन सामने बाकी आहेत. चेक प्रजासत्ताकच्या सामन्यानंतर आमचे विश्वचषकाचे तिकीट निश्चित होऊ शकते, त्यावेळी आनंद साजरा करू असे प्रान्डेली यांनी सांगितले.
* उरुग्वेचा पेरुवर विजय
 ल्युईस सुआरेझच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर २०१४ विश्वचषक पात्रता फेरीच्या लढतीत उरुग्वेने पेरूवर २-१ असा विजय मिळवला. लिव्हरपूल क्लबतर्फे खेळणाऱ्या सुआरेझवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. यामुळे यंदाच्या हंगामात त्याला खेळता आले नव्हते. बंदी संपल्यानंतर सुआरेझने दिमाखात पुनरागमन केले आहे. मध्यंतराला दोन मिनिटे असताना पेनल्टी किकचे रुपांतर गोलमध्ये केले. यानंतर ६७व्या मिनिटाला सुआरेझने आणखी एक गोल करत उरुग्वेला भक्कम आघाडी मिळवून दिली. ८४ व्या मिनिटाला पेरुतर्फे जेफरसन फारफानने गोल केला.
फुटबॉल विश्वचषक २०१४ पात्रता फेरीच्या सामन्यात विश्वविजेत्या स्पेनने फिनलंडवर २-० अशी मात केली. १९व्या मिनिटाला सेक
कोलंबियाने इक्व्ॉडोरवर १-० विजय मिळवत विश्वचषकात स्थान मिळवण्याच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. जेम्स रॉड्रिग्युझच्या एकमेव गोलच्या जोरावर कोलंबियाने हा विजय साकारला.