News Flash

FIFAच्या बक्षिसावर माफियाचं सावट; रोनाल्डोच्या बहिणीचा खळबळजनक आरोप

माफियाच्या मदतीने सर्वोकृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार 'विकत' घेतला

ख्रिस्तियानो रोनाल्डो

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) देण्यात येणारा फुटबॉल विश्वातील सर्वोच्च असा ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कार क्रोएशियाचा कर्णधार ल्युका मॉड्रीच याला देण्यात आला. या पुरस्कारामुळे तब्बल १० वर्षानंतर हा पुरस्कार एका नव्या खेळाडूला मिळाला. गेल्या दहा वर्षात हा पुरस्कार पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी यांच्यापैकीच एकाला मिळत होता. पण अखेर तब्बल १० वर्षांनंतर फुटबॉल जगताला नवा हिरो मिळाला. पण या पुरस्काराबाबत रोनाल्डोच्या मोठ्या बहिणीने खळबळजनक आरोप केले आहेत.

यंदा देण्यात आलेला पुरस्कार हा माफियाच्या मदतीने विकत घेण्यात आला आहे, अशा आशयाचा संदेश रोनाल्डोची मोठी बहीण एल्मा अव्हेरो हिने इंस्टाग्रामवर लिहिला आहे.

तिने आपल्या पोस्टमध्ये रोनाल्डोचा फोटो शेअर केला आहे आणि त्या खाली लिहिले आहे की दुर्दैवाने आपण अशा जगात राहतो ज्या जगात माफियाचं राज्य आहे. पैशाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यंत्रणा खराब झालेली दिसत आहे. पण देव हा साऱ्यावर उपाय आहे. तो या नकारात्मक शक्तींवर तोडगा आहे. तो थोडा वेळ घेत असेल पण तो कधीही अयशस्वी होत नाही, असे तिने लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2018 6:11 pm

Web Title: cristiano ronaldos sister blames money and mafia power for fifas ballon dor award
टॅग : Cristiano Ronaldo,Fifa
Next Stories
1 IPL 2019 : दिल्लीनं नाव बदललं; नशीबही बदलणार?
2 रणजी क्रिकेट : महाराष्ट्राविरुद्ध सामन्यात सिद्धेश लाड मुंबईचा कर्णधार
3 IND vs AUS : गिलख्रिस्टने विराटला बसवलं ‘या’ थोर खेळाडूंच्या पंगतीत
Just Now!
X