मेलबर्न : पंचांना अपशब्द उच्चारणाऱ्या टेनिसपटू सेरेना विल्यम्सवर ऑस्ट्रेलियातही कडाडून टीका करण्यात आली आहे. येथील एका वृत्तपत्राने तिचे व्यंगचित्र पहिल्या पानावर छापले आहे. हे व्यंगचित्र याआधी एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते.

सेरेनाकडून बेशिस्त वर्तन झाल्यानंतर लगेचच ख्यातनाम व्यंगचित्रकार मायकेल नाईट यांनी सेरेनाच्या वर्तनाबद्दल व्यंगचित्र काढले होते. मात्र या व्यंगचित्रावरून खूप खळबळ उडाली होती.

या व्यंगचित्राद्वारे वर्णद्वेषी धोरणाचा संबंधित वृत्तपत्राने उपयोग केला आहे, असाही आक्षेप घेण्यात आला होता. मात्र नाईट यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले, ‘‘सेरेनाला बेशिस्त वर्तनाबद्दल पंचांकडून कारवाईसही सामोरे जावे लागले आहे व ही तांत्रिक बाजू लक्षात घेऊनच व्यंगचित्राद्वारे तिच्यावर टीका केली आहे.’’