30 March 2020

News Flash

विराटची शतकांची हॅटट्रीक, शोएब अख्तर म्हणतो माझं आव्हान पूर्ण कर !

विराट पूर्ण करु शकेल आव्हान?

विराट कोहली (संग्रहीत छायाचित्र)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. विंडीजविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने आपलं 38 वं शतक साजरं केलं. याचसोबत सलग 3 वन-डे सामन्यांमध्ये शतक झळकावणारा विराट पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. या खेळीनंतर विराटवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मात्र पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीसमोर एक आव्हान ठेवलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विराटच्या खेळीची स्तुती करताना शोएबने विराटला 120 शतकांचा टप्पा ओलांडण्याचं आव्हान दिलं आहे.

कोहलीने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावूनही भारताला सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सोमवारी मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. तिसऱ्या सामन्यात मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. याचसोबत गोलंदाजीदरम्यान अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी वारेमाप धावा दिल्या. त्यामुळे चौथ्या एकदिवसीय सामन्यात संघाचा योग्य समतोल राखणं हे विराटसमोर मोठं आव्हान असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2018 6:44 pm

Web Title: cross the 120 hundred mark i set up for you says akhtar to kohli
Next Stories
1 विंडीजच्या तळातल्या खेळाडूंनी सामना फिरवला – जसप्रीत बुमराह
2 तुला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे! निवड समितीचा धोनीला सूचक इशारा
3 धोनीला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच !
Just Now!
X