News Flash

CSK vs RCB : IPLमध्ये सुरेश रैनाचे ‘खास’ द्विशतक!

बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रैनाची २४ धावांची खेळी

सुरेश रैना

मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ आज आमनेसामने आले आहेत. महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या भारताच्या माजी-आजी कर्णधारांमध्ये ही लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील मोसमात संघाबाहेर असणाऱ्या सुरेश रैनाने या सामन्यात बंगळुरूच्या यजुर्वेंद्र चहलला षटकार ठोकत मोठा विक्रम नोंदवला आहे.

 

आयपीएलच्या इतिहासात २०० षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये रैनाने स्थान मिळवले आहे. डावाच्या १०व्या षटकात रैनाने चहलला षटकार ठोकला. त्यामुळे आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे. तर, रोहित शर्मा विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीनंतर २०० षटकार ठोकणारा रैना चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रैनाने ३ षटकार आणि एका चौकारांसह २४ धावा केल्या.

रैनाची कारकीर्द

सुरेश रैनाने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने २००५ ते २०१८ या काळात भारताकडून १८ कसोटी, २२६ एकदविसीय आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर अनुक्रमे ७६८, ५६१५, १६०५ धावा  आहेत.

IPLमध्ये सर्वाधिक षटकार

  • ३५४ – ख्रिस गेल
  • २४० – एबी डिव्हिलियर्स
  • २२२ – रोहित शर्मा
  • २१७ – एमएस धोनी
  • २०४ – विराट कोहली
  • २०२ – कायरन पोलार्ड
  • २०२ – सुरेश रैना
  • १९९ – डेव्हिड वॉर्नर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 4:56 pm

Web Title: csk batsman suresh raina became seventh player to smash 200 sixes in ipl adn 96
Next Stories
1 IPL २०२१ दरम्यान हैदराबादच्या माजी क्रिकेटपटूचे निधन
2 CSK vs RCB: चेन्नईच्या धोनी ब्रिगेडनं विराटसेनेचा विजयरथ रोखला
3 CSK vs RCB : वानखेडेवर आज भारताचे आजी-माजी कर्णधार भिडणार! आकडेवारीत धोनीब्रिगेड अव्वल!
Just Now!
X