IPL मध्ये चेन्नईकडून खेळणारा वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने निवृत्तीच्या निर्णयावरून यु-टर्न घेतल्यानंतर त्याला विंडीजच्या संघात स्थान मिळालं आहे. २५ ऑक्टोबर २०१८ ला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्राव्होने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ब्राव्हो वेस्ट इंडिज संघाकडून कधीही खेळणार नाही हे स्पष्ट होते. पण १३ डिसेंबरला ब्राव्होने निवृत्तीच्या निर्णयावरून माघार घेतली. तो केवळ टी २० क्रिकेट खेळणार आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील त्याचा निवृत्तीचा निर्णय त्याने कायम ठेवला आहे.

“BCCI, जरा लाज वाटू द्या”; संजू सॅमसनला वगळल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संताप

विंडीजची १५ ते १९ जानेवारी दरम्यान तीन टी २० सामन्यांची मालिका आहे. ही मालिका विंडीजमध्ये खेळण्यात येणार आहे. त्यासाठी ब्राव्होला संघात स्थान देण्यात आले आहे.

Video : भावा….. नादखुळा! चहलच्या थ्रोवर विराट फिदा

निवृत्तीच्या निर्णयावरून का घेतला ‘यू-टर्न’?

विंडीज क्रिकेट मंडळातील प्रशासकीय बदलांमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. “मला वेस्ट इंडिजसाठी केवळ टी २० क्रिकेट खेळायचे आहे. माझ्या मनात हा विचार खूप दिवसांपासून होता. क्रिकेट मंडळाच्या प्रशासकीय स्तरावरील बदलांची मी वाट पाहात होतो. ते बदल झाल्यानंतर मी टी २० मध्ये परतण्याचा विचार केला”, असे ब्राव्होने टी २० निवृत्तीचा निर्णय रद्द करताना सांगितले.

Video : सुपर यॉर्कर! सैनीने उडवला फलंदाजाचा भन्नाट त्रिफळा

फक्त टी २० क्रिकेटच खेळणार!

“माझ्या पुनरागमनाच्या निर्णयामुळे मी एकदिवसीय आणि कसोटी सामनेही खेळणार का असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण मी स्पष्ट करतो की मी एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेटमध्ये परतणार नाही. मी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. टी २० क्रिकेट खेळण्यासाठी मी खूपच आतुर आहे. मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या चाहत्यांना आणि माझ्या नातेवाईकांना धन्यवाद”, असेही ब्राव्हो म्हणाला होता.