IPL 2021च्या लिलावासाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे. या लिलावात अनेक बड्या खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. स्टीव्ह स्मिथ, जेसन रॉय, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गजांचे IPL भविष्य उद्या ठरणार आहे. तसेच, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याच्यावरही उद्या बोली लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या लिलावासाठी सारेच खेळाडू आणि चाहते उत्सुक आहेत. मात्र त्यातच CSKच्या एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

IND vs ENG: इंग्लंडची दाणादण उडवत ‘टीम इंडिया’ने केला ‘हा’ विक्रम

गेली अनेक वर्षे CSK संघाचा आणि दक्षिण आफ्रिकन संघाचा दमदार फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी त्याने आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. पाकिस्तान दौऱ्यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर डु प्लेसिसने हा निर्णय जाहीर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Faf du plessis (@fafdup)

IND vs ENG: धमाकेदार विजयासोबतच विराटची धोनीच्या पराक्रमाशी बरोबरी

फाफ डु प्लेसिसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझ्यासाठी असा निर्णय घेणं खूपच कठीण होतं. पण भविष्याचा विचार करून आणि नव्या आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. १५ वर्षांपूर्वी मला कोणी सांगितलं असतं की मी आफ्रिकेकडून ६७ कसोटी सामने खेळणार आहे आणि काही सामन्यांचे नेतृत्व करणार आहे, तर माझा माझ्यावर विश्वास बसला नसता. पण आता पुढील दोन वर्षात दोन टी२० विश्वचषक आहेत. त्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे”, अशा आशयाचं पत्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.