News Flash

…म्हणून CSK ने जिंकलं IPL 2018 चं विजेतेपद – एन. श्रीनिवासन

सध्या BCCI मध्ये कार्यरत असलेले लोक हे स्वत:चा फायदा बघतात, असे आरोपही त्यांनी केले.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०१८ च्या IPL हंगामाचे विजेतेपद जिंकले. २ वर्षाच्या बंदीनंतर CSK आणि राजस्थान रॉयल्स RR हे संघ IPL च्या स्पर्धेत उतरले होते. त्यात राजस्ताहनला आपला ठसा तितकासा उमटवता आला नाही. पण चेन्नईच्या संघाने थेट IPL विजेतेपदाला गवसणी घातली. मात्र हा पराक्रम CSK च्या खेळाडूंनी रागाच्या भरात केला होता, असे CSK चे मालक एन. श्रीनिवासन यांनी सांगितले.

चेन्नई सुपरकिंग्ज संघावरील बंदी घालण्यात आली होती. पण चेन्नई सुपरकिंग्ज संघावरील बंदी ही योग्य नव्हती. कारण संघातील खेळाडूंनी कोणताही चूक केलेली नव्हती. CSK च्या खेळाडूंना जी शिक्षा भोगावी लागली, ते त्या शिक्षेच्या पात्र नव्हते. पण तरीही त्यांनी शिक्षा भोगली. त्यामुळे या गोष्टीचा राग मनात धरून ते त्वेषाने खेळले आणि त्यांनी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, असे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबर असलेल्या काही व्यक्तींनी फिक्संग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांचे सट्टेबाजांशी असलेले संबंधही उघड झाले होते. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आली होती. मात्र आयपीएलमधील स्पॉट-फिक्संगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जवर घालण्यात आलेली बंदी ही अयोग्य होती, असेही ते म्हणाले.

बीसीसीआयमध्ये मी काम केले आहे. मी बीसीसीआयचा अध्यक्षही होतो. पण मी कधी कोणाच्या फायद्यासाठी काही केले नाही. याउलट सध्या BCCI मध्ये कार्यरत असलेले लोक हे स्वत:चा फायदा बघतात, असे आरोपही त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 5:33 am

Web Title: csk won ipl 2018 because of anger says n shrinivasan
Next Stories
1 ‘लक्ष्य’ भेदाचे धडे!
2 खो-खोमध्ये महाराष्ट्राला दुहेरी सुवर्णपदके
3 जोकोव्हिच, सेरेनाची विजयी घोडदौड कायम
Just Now!
X