बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामात उद्घाटन सोहळ्याला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींना बोलावून त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम असलेल्या या सोहळ्यासाठी आयपीएलला अंदाजे ३० कोटी रुपये खर्च येतो. मात्र हा खर्च अनावश्यक असल्याचं मत, गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत समोर आलं. ज्यावर एकमत झाल्यामुळे उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

“उद्घाटन सोहळ्यावर होणारा खर्च हा अनावश्यक आहे. चाहत्यांना या सोहळ्यात तिळमात्र रस नसतो, पण यामध्ये प्रचंड पैसा वाया जातो.” गव्हर्निंग काऊन्सिलमधल्या सदस्याने इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली. बुधवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींसह हॉलिवूड कलाकारांनी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावली होती.

याचसोबत गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत No-Ball साठी स्वतंत्र पंच आणि Power Player चा निर्णय तूर्तास रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

अवश्य वाचा – Power Player चा निर्णय तूर्तास रद्द, No-Ball साठी स्वतंत्र पंच