इंग्लंडमध्ये सुरु होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. आयपीएलचा बारावा हंगामही आता उत्तरार्धाकडे आलेला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आपलं प्ले-ऑफमधलं स्थान पुन्हा एकदा कायम राखलं आहे. मात्र याचदरम्यान आयसीसीने विश्वचषक संघात स्थान मिळू न शकलेल्या दुर्दैवी ११ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या अंबाती रायुडू आणि ऋषभ पंतला संघात जागा मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या निवड समितीने विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. या संघात ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू यांची जागा पक्की मानली जात होती. मात्र निवड समितीने ऋषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला पसंती दिली. तर अंबाती रायुडूच्या जागी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आलं. यानंतर आयसीसीने सर्व संघातील दुर्दैवी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

असा आहे, आयसीसीचे दुर्दैवी ११ जणांचा संघ –

मोहम्मद रिझवान (पाकिस्तान), निरोशन डिकवेला (श्रीलंका), ऋषभ पंत (भारत), अंबाती रायुडू (भारत), दिनेश चंडीमल (श्रीलंका), जोफ्रा आर्चर (इंग्लंड), असिफ अली (पाकिस्तान), कायरन पोलार्ड (विंडीज), पिटर हँडस्काँब (ऑस्ट्रेलिया), अकिला धनंजया (श्रीलंका), मोहम्मद आमिर (पाकिस्तान)