26 October 2020

News Flash

नायजेरियावर मात करुन भारतीय पुरुषांची सुवर्णपदकाची कमाई

नाजयेरियाचा अंतिम फेरीत ३-० ने उडवला धुव्वा

भारताचा हरमीत देसाई अंतिम सामन्यादरम्यान खेळताना

भारतीय महिलांपाठोपाठ पुरुष संघानेही टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत भारताने नायजेरियावर ३-० ने मात करत, सुवर्णपदकावर मोहर उमटवली. अंतिम सामन्यात नायजेरियाने पुनरागमन करत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र अचंता शरथ कमाल, सत्यन गणशेखरन, हरमीत देसाई यांनी भारतीय संघाचं सामन्यातं आव्हान कायम राखलं. भारतीय महिलांनी अंतिम सामन्यात सिंगापूरवर ३-२ ने मात करत पहिल्यांदाच सुवर्णपदकाची कमाई केली होती. भारताच्या विजयात अचंता शरथ कमालने मोलाचा वाटा उचलला.

अवश्य वाचा – भारतीय बॅडमिंटन संघाचा गोल्डन स्मॅश! अंतिम फेरीत मलेशियावर केली मात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2018 5:42 pm

Web Title: cwg 2018 india beat nigeria for gold sweep table tennis team event
Next Stories
1 विजयाची खात्री होती, रौप्य पदकाचा विचारही मनात आला नाही – जीतू राय
2 अक्षर पटेलचा काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय, डरहम क्रिकेट क्लबचं करणार प्रतिनिधीत्व
3 ‘त्या’ तिघांना जमलं नाही ते कोलकात्याच्या ‘राणादा’ने करुन दाखवलं!
Just Now!
X