19 September 2020

News Flash

भारताची मलेशियावर २-१ ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चीत

पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताला २-२ अशी बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं.

भारतीय हॉकी संघ (संग्रहीत छायाचित्र)

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांच्या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला आपली लय सापडलेली आहे. साखळी फेरीत आपला तिसरा सामना खेळणाऱ्या भारताने मलेशियावर २-१ अशी मात करत उपांत्य फेरीतला आपला प्रवेश निश्चीत केला आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताला २-२ अशी बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. दुबळ्या वेल्सच्या संघावर भारताने मात केली, मात्र या सामन्यातही भारताला विजयासाठी ४-३ असं झुंजावं लागलं होतं.

मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारताने आपली मरगळ झटकत दमदार पुनरागमन केलं. भारताकडून तरुण ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने दोन गोल केले. त्याचे हे गोल सामन्यात निर्णायक ठरले. मलेशियाकडून फैजल सारीने १६ व्या मिनीटाला गोल करत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण हरमनप्रीतने त्याच्या या प्रयत्नांना सुरुंग लावला. साखळी फेरीत भारताचा इंग्लंडविरुद्ध सामना अजुन बाकी आहे. उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं टाळायचं असल्यासं, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 8:27 am

Web Title: cwg 2018 india win 2 1 against malaysia qualify for semis
टॅग Hockey India
Next Stories
1 २५ मी. पिस्तुल प्रकारात हिना सिद्धुला सुवर्णपदक, बॉक्सर्सच्या धडाकेबाज कामगिरीने भारताची ६ पदकं निश्चीत
2 नशिबाची थट्टा ! सुवर्णपदक विजेत्या मॅरेथॉन धावपटूवर चहा विकण्याची वेळ
3 प्रो कबड्डीच्या आगामी हंगामासाठी यू मुंबा संपूर्ण संघ बदलणार
Just Now!
X