ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमंध्ये भारताच्या अॅथलिट्सनेही आपला डंका वाजवला आहे. बॉक्सर मेरी कोम, गौरव सोळंकी, नेमबाजपटू संजीव राजपूत यांच्यामागोमाग भालाफेकपटू नीरज चोप्रानेही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत ८६.४७ मी, लांब भाला फेकत नीरजने आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. याआधी ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. नीरजने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

दुसरीकडे कुस्तीमध्ये भारताच्या विनेश फोगटने ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात भारताला आणखी एका सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. कॅनडाची खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन जेसिका मॅक्डोनाल्डला हरवत कुस्तीततलं भारताचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं.

याव्यतिरीक्त भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत.

  • रिओ ऑलिम्पीक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला पुन्हा एकदा कांस्यपदक
  • ६० किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर मनीष कुमारला रौप्यपदक
  • ४९ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित फोंगलला रौप्यपदक, भारताची सुवर्णपदकाची संधी हुकली